शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी जी.डी. लाड अध्यासन केंद्राची सुरुवात, सोमवारी विशेष कार्यक्रम
schedule21 Aug 25 person by visibility 12 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन स्थापन करण्यात येत आहे. त्यानिमित्त सोमवारी ( २५ ऑगस्ट २०२५) विशेष व्याख्यान आणि शाहिरी सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजि केला आहे.. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड यांच्या नावे शिवाजी विद्यापीठात अध्यासन सुरू होत आहे. या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक तथा संपादक उत्तम कांबळे यांचे ‘भारतीय स्वातंत्र्यलढा आणि जी.डी. (बापू) लाड’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरचे शाहीर सदाशिव निकम यांचे शाहिरी सादरीकरणही यावेळी होईल. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात २५ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील. आमदार अरुण लाड आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.