कंपनी सेक्रेटरी रोजगाराचे उत्तम क्षेत्र- कौस्तुभ गावडे
schedule21 Aug 25 person by visibility 38 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ कंपनी सेक्रेटरी हे एक रोजगाराचे उत्तम क्षेत्र आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ सनदी लेखापाल, बँकिग क्षेत्र, स्पर्धा परीक्षा यामध्येच नोकरीच्या संधी न शोधता कंपनी सेक्रेटरी यामध्येही करिअर करण्यासाठीचा एक चांगला पर्याय म्हणून पाहावे.’ असे उदगार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी काढले.
विवेकानंद कॉलेजमधील आय.क्यु.ए.सी., वाणिज्य विभाग तसेच करिअर कौन्सीलींग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सीएस जयदीप पाटील प्रमुख वक्ते होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, त्यांनी, ‘कंपनी सेक्रेटरी होण्यासाठीच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांनी माहिती घ्यावी. विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रात करिअर करावे.’असे सल्ला दिला. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी कॉलेजने आयोजित केलेल्या अशा विविध नोकरी विषयी व व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा. अमित कुमार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, प्रा. शिल्पा भोसले यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ.ए.एल.मोहिते, डॉ.वाय बी माने, डॉ. यू डी दबडे, सचिन बीडकर उपस्थित होते.