पंचगंगेने गाठली धोक्याची पातळी, चिखलीतील पूरग्रस्तांचे स्थलांतर
schedule21 Aug 25 person by visibility 327 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीने गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता धोक्याची पातळी गाठली. 43 फुटापर्यंत पाणी पोचले आहे. दरम्यान पूरस्थितीचा विचार करून प्रशासनाने तूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरणास सुरुवात केली आहे. चिखली येथील पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना वाहनातून अन्यञ हलविले जात आहे अशी माहिती करवीर चे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे. दसरा चौक सुतार वाडा येथील बारा कुटुंबांचे चित्रदुर्ग मठात स्थलांतर केले आहे. एकूण 51 नागरिक आहेत.
आणूर बस्तवडे रस्त्यावर ट्रक चालक व क्लीनर या दोघांनी पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद असतानाही रस्त्यात लावलेली बॅरिकेड्स बाजूला करून नदीच्या पाण्याच्या दिशेने निघाले. त्यांचा ट्रक पाण्यात बंद पडला.
पुराच्या पाण्याने वेढलेल्या ट्रकवर हे दोघेही चढून उभे होते. त्यांच्याशी मोबाईल कॉन्टॅक्ट होत होता, पण ते दोघेही पुरात अडकल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हते. पोलीस व ग्रामस्थ उपस्थित होते.अशावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले. या पथकाच्या स्वयंसेवकांनी ट्रक चालक व क्लिनर या दोघांची सुखरूप सुटका केली. दरम्यान कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर आलेले पुराचे पाणी कमी झाल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक रात्रभर नागरिकांच्या मदत व बचाव कार्यात उतरले.. पुराचा धोका ओळखून वेळेत स्थलांतर व्हा, जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे, अशा शब्दांत आवाहन करून जिल्हाधिकारी येडगे यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला.यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार करवीर स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असून धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणाच्या सांडव्यावरून असणाऱ्या विसर्गामध्ये घट झाली असून सद्यस्थितीमध्ये सांडव्यावरून 14000 घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरु आहे. विद्युतनिर्मिती केंद्रातून 1500 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणामधून एकूण 15500 प्रतिसेकंद इतका विसर्ग दूधगंगा नदीपात्रामध्ये सुरू आहे. नदीपात्रातील पाणी पातळीत थोडी घट होऊ शकते. दूधगंगा नदीकाठावरील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात उतरू नये. सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.