संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन
schedule21 Aug 25 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे १३ वा वर्धापन दिनानिमित्ताने “निंबस २ के २५” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन २३ ऑगस्ट २०२५ रोजी केले आहे. या कार्यक्रमात नवोन्मेष, प्रेरणा आणि उत्सव यांचा सुंदर संगम पहायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कॅड बस्टर, पोस्टर प्रेसेंटेशन, सर्किट्रिक्स हँक हंट, मेलोडी मस्ती, तसेच कौन बनेगा सवालों का सरताज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. विजेत्यांसाठी एक लाख रुपयापर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी रक्तदान शिबिर व पुस्तक दान उपक्रम होणार आहेत.
हा कार्यक्रम संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रत करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवा असे आव्हान करण्यात आले आहे. सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून, इन्स्टिट्यूटच्या संकेतस्थळावर तसेच : https://forms.gle/mpcvXZg8vAcU1HX48 लिंकवरून नोंदणी करता येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा. एम. एस. काळे, प्रा. सौ. एन. एस. सासणे व टीम परिश्रम घेत आहेत, या कार्यक्रमाला संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.