Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी जी.डी. लाड अध्यासन केंद्राची सुरुवात, सोमवारी विशेष कार्यक्रमबहरलेली परसबाग पाहून सुखावले अधिकारी, सडोली खालसा केंद्र शाळेला भेट !कोल्हापुरात रविवारी -सोमवारी रंगणार साहित्यिक - कलावंतांची मैफलगोकुळमार्फत लवकरच जनावरांसाठी प्रेग्नेंसी रेशन पशुखाद्य - चेअरमन नविद मुश्रीफसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजनकंपनी सेक्रेटरी  रोजगाराचे उत्तम क्षेत्र- कौस्तुभ गावडेकोल्हापूर इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांची डोळे तपासणीअजित पवारांचे जंगी स्वागत करणार, दौऱ्याची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी ! पुईखडी ते सडोली खालसा मोटारसायकल रॅली!!पंचगंगेने गाठली धोक्याची पातळी, चिखलीतील पूरग्रस्तांचे स्थलांतरपंचगंगा सरकतेय धोका पातळीकडे, कोल्हापुरला पुराचा धोका ! ३५ नागरिकांचे स्थलांतर, पाच हॉस्पिटल्सना नोटिस, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली!!

जाहिरात

 

बहरलेली परसबाग पाहून सुखावले अधिकारी, सडोली खालसा केंद्र शाळेला भेट !

schedule21 Aug 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग, सेमी इंग्रजीची सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती अन् शालेय परिसरातील मोकळया शिक्षकांनी शिक्षकांनी तयार केलेली परसबाग.हे चित्र आहे. करवीर तालुक्याती सडोली खालसा येथील केंद्र शाळेचे. नियमित शालेय कामकाज सांभाळत या शाळेत परसबागेत भाजीपाला पिकविला. दहा दिवसात अडीच हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी गुरुवारी (२१ ऑगस्ट २०२५) शाळेला भेट दिली.

त्यांनी शाळेचा संपूर्ण परिसर पाहिला. शाळेचे स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, संगणक कक्ष, स्वच्छता या सर्व बाबीचे निरीक्षण करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच परसबाग कशा पद्धतीने फुलविली आहे याची माहिती घेतली. मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी शाळेविषयी माहिती दिली. तसेच  परसबाग निर्मितीची प्रक्रिया उलगडली.  मुख्याध्यापक कांबळे म्हणाले, ‘गेली दोन वर्षे ही परसबाग तयार करण्यामध्ये खूप परिश्रम करावे लागले. प्रथम  जेसीबीच्या साहाय्याने मुरूम काढून घेतले व जमीन  सपाट केली. जमीन शेती योग्य केल्यानंतर नदीची  लाल माती वीस ट्रॉल्या  आणल्या.  सपाटीकरण झाल्यावर तीन फूट अंतर ठेवून सऱ्या काढल्या. सेंद्रिय खात पसरून घेतले. ठिबक सिंचन, गांडूळ खत योजना सेंद्रिय खत पारंपरिक शेती व आधुनिक शेती यांचा मेळ घालून सहा गुंठ्यामध्ये गवारी भेंडी, वांगी, मिरची टोमॅटो, चवळी, श्रावण घेवडा, कोथिंबीर, अंबाडा वरणा,काकडी दोडका इत्यादी सर्व प्रकारचा भाजीपाला पिकविला.  केलेला असून दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजाराचे उत्पन्न मिळवले आहे.’

शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘ज्या ज्या शाळेमध्ये अशा प्रकारची जागा शिल्लक आहे त्या शाळेमध्ये शिक्षकांनी परसबाग करण्यास कोणतीही हरकत नाही, यातून स्वनिर्मितीचा आनंद, श्रमप्रतिष्ठा,शेती विषयी आवड ही मूल्य विद्यार्थ्यांना शिकवता येतील.’

मुख्याध्यापक कांबळे यांनी, ‘सर्व शिक्षक शैक्षणिक उपक्रमात सहभागी असतात. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून सेमी इंग्लिश आहे. पहिली ते चौथीपर्यंतची किमान ८० विद्यार्थी इंग्रजीस्पेलिंग सहीत अस्खलितपणे पुस्तकातील पाठाचे वाचन करतात. शाळेसाठी ग्रामपंचायत, शाळा कमिटीचे सहकार्य लाभते’असे सांगितले. याप्रसंगी शाळेतर्फे  शिक्षणाधिकारी शेंडकर यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. परसबागेतील भाजी भेट देण्यात आली. याप्रंगी उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे, केंद्रप्रमुख एस व्ही पाटील, के वाय कुंभार, नम्रता पाटील, दिपाली किरुळकर, मृणाली वाघरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes