+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule14 Oct 24 person by visibility 41 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी,(१५ ऑक्टोबर २०२४) कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये इचलकरंजी आणि गडहिंग्लज येथे जाहीर सभा होणार आहेत.
 इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृह येथे दुपारी तीन ते पाच या वेळेत जाहीर सभा होणार आहे. तर गडहिंग्लज येथील हॉटेल सुर्या येथे सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सभा होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विविध भागात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
  दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोल्हापूर उत्तर, कागल, इचलकरंजी, चंदगड, शिरोळ, राधानगरी या मतदारसंघावर दावा केला आहे. कोल्हापूर उत्तरसाठी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, चंदगड मधून डॉ. नंदा बाभुळकर कुपेकर व अमर चव्हाण यांनी मुलाखती दिल्या. राधानगरीमधून ए. वाय. पाटील, संतोष मेघाणे व डॉ.नवज्योतिसिंह देसाई इच्छुक आहेत. कागलमधून समरजितसिंहराजे घाटगे तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे इच्छुक आहेत. शिरोळमधून स्नेहा देसाई यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पुणे येथे त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत.