+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule13 Oct 24 person by visibility 54 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : cआगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाची तयारी म्हणून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे विजय संकल्प रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलक हातामध्ये घेऊन कार्यकर्ते उत्साहात अनेक घोषणा देत या रॅलीमध्ये सामील झाले होते. 
भारत माता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणा देंत रॅली शहरातील विविध भागातून निघाली.  जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने  निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले,  " गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे .यामुळे राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून द्यायचे ठरविले आहे. "  दरम्यान ही विजय संकल्प मोटरसायकल रॅली यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
 यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहुल चिकोडे,  महिला मोर्चा अध्यक्षा रूपाराणी निकम, राजू मोरे, अतुल चव्हाण, अमर साठे, , मंडलाध्यक्ष प्रकाश सरनाईक, विशाल शिराळकर, सचिन कुलकर्णी, अनिल कामत, प्रज्ञेश हमलाई, अशोक लोहार, रामसिंग मोर्य, सतीश अंबर्डेकर, दिलीप बोंद्रे, रविकिरण गवळी, विजय आगरवाल, संजय जासूद, कोमल देसाई, माधुरी कुलकर्णी, रीमा पालनकर, रश्मी साळुंखे, अवधूत भाटे, विवेक कुलकर्णी, रोहित कारंडे अरविंद वडगावकर, राजाराम नरके, सचिन पवार, विश्वजीत पवार, सुजाता पाटील, सुमित पारखे, विश्वजीत पवार, दिग्विजय कालेकर, युवराज शिंदे, विशाल पाटील आदी उपस्थित होते.