कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
schedule14 Oct 24 person by visibility 151 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ लिंगायत माळी समाजातर्फे गेल्या काही वर्षात विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची ताकद वाढवण्याचा आणि समाज एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी जो उपक्रमांचा धडाका लावला आहे, तो इतर समाजालाही प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार खासदार शाहू महाराज यांनी काढले.
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेतर्फे समाज मेळावा, वधू-वर सूचक मेळावा, जीवनगौरव पुरस्कार व समाज भूषण पुरस्कार वितरण समारंभात खासदार शाहू महाराज बोलत होते. कोल्हापुरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास माजी आमदार अमल महाडिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे, वीरशैव बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिलीप चौगले, उद्योजक सी एम. माळी, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजू वाली आदी उपस्थित होते. यावेळी मारुती माळी यांना जीवनगौरव व निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खासदार शाहू महाराज म्हणाले,“अनेक वर्षापासून लिंगायत माळी समाज मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येत आहे. हा मेळावा आता व्यापक झाला आहे. समाजासाठी कष्ट करून समाज परिवर्तन व्हावे, यासाठी लिंगायत माळी समाज पुढील काळात नेतृत्व करेल. “
प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष संतोष माळी यांनी स्वागत केले. मेळाव्याच्या निमित्ताने लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. त्याचा बक्षीस समारंभ अभिनेता आनंद काळे, सी.एम. माळी व अमोल माळी यांच्या हस्ते झाला. विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या पार्थ माळी, ओम माळी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपाध्यक्ष अनिल माळी, सचिव राजू यादव, खजानिस किशोर माळी, कार्याध्यक्ष मीनाक्षी माळी, सोमनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक माळी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले. आभार महिला संघटनेच्या अध्यक्षा साधना माळी यांनी मानले.