समिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद
schedule14 Oct 24 person by visibility 130 categoryलाइफस्टाइल
र्महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील समिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी, पंधरा ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषद आयोजित केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी दिली आहे. दैवेज्ञ बोर्डिंग सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.
गेल्या काही वर्षात कोल्हापूर सर्वार्थाने मागे पडत चालले आहे. नागरी सुविधांचा विकासासोबतच शहरातील तरुणाईची वाढती व्यसनाधीनता, धार्मिक उत्सवातील गैरप्रकार, वाढत चाललेले सामाजिक अध:पतन आणि वाढती गुन्हेगारी हे शहरांमधील दुर्जन शक्तीचा वाढत चाललेला प्रभाव दर्शविते. या सर्व गोष्टींचा सामान्य माणसाला त्रास होत असला तरी त्याविरोधात काही करण्याची त्यांची मानसिकता नसते. त्यामुळे समाजात चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे प्राबल्य वाढत चालले आहे. हे प्राबल्य कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत ह.भ. प. सुहास लिमये ये प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेस दैवज्ञ बोर्डिंगचे माजी अध्यक्ष एकनाथ चोडणकर, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष विकास सांगावाकर, प्रख्यात वैधानिक लेखापाल सतीश डकरे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत देसाई, उद्योजक अभय देशपांडे आणि डॉ. रामचन्द्र लिमये यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागरिकांनी या परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन ठाणेकर यांनी केले आहे.