+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule14 Oct 24 person by visibility 93 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने सीएसआर फंडातून शाळा बांधण्यासाठी ६ कोटी ८५ लाखाची रक्कम दिली. या निधीतून करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या जिल्हा परिषदेच्या कुमार आणि कन्या शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला.
 या शाळेच्या पायाभरणी समारंभप्रसंगी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असून, विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी चांगल्या इमारती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून निधी दिला जातो. शिवाय काही कंपन्यांकडून सीएसआर फंडही मिळवला जातो. या निधीतून शाळांच्या इमारती चांगल्या होतीलच, पण विद्यार्थ्यांना उत्तम सुविधांसह दर्जेदार शिक्षण मिळेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
माजी आमदार अमल महाडिक यांनी मनोगत व्यक्त करुन, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावल्याचे सांगितले. यावेळी सरपंच तानाजी पाटील, अशोक दांगट, अनिल पाटील, पंडित पाटील, प्रदीप झांबरे, आप्पासो धनवडे, सचिन कांबळे, वैभव गवळी, मनीष पाटील, सचिन पाटील, दादा धनवडे, रणजित राशिवडे, बाबासो पाटील, जितेंद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नेर्ले, समरजित पाटील  उपस्थित होते.