+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule14 Oct 24 person by visibility 27 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
“गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपतर्फे ज्वेलर्स सुरक्षेसाठी नवीन उच्चतम दर्जाची तिजोरी बाजारा उपलब्ध केली आहे. सुरक्षा जागरुकता कार्यक्रमातंर्गत या नवीन तिजोरीच्या वापरासंबंधी सराफ व्यावसायिकासाठी कोल्हापुरात मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. शिवाय पश्चिम बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी उद्यमनगरमध्ये नवीन दालन सुरू केले आहे. नवीन दालनाच्या उद्घाटनाने कोल्हापुरात २५ टक्के व्यवसाय वाढीची अपेक्षा आहे.” माहिती गोदरेज अँड बॉयसच्या सिक्युरिटी सोल्युशन बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख पुष्कर गोखले यांनी दिली.
येथील रेसिडेन्सी क्लब येथे सराफ व्यावसायिकांसाठी सुरक्षाविषयक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी नवीत तिजोरीचे अनावरण झाले. गोदरेज अँड बॉयसच्या सुरक्षाविषयक उपाय सुविधा व्यवसायाने ज्वेलरी क्षेत्रासाठी खास तयार केलेली अत्याधुनिक उच्च सुरक्षा उत्पादन श्रेणी सादर केली असल्याचे त्यांनी सांगितले.
गोदरेजने व्यापक संशोधन आणि विकासाद्वारे विकसित केलेल्या प्रगत बॅरियर सामग्रीसह तयार केलेली ही तिजोरी उत्कृष्ट साधन प्रतिरोधक क्षमता पुरविते. जोडीला त्यात एक स्लीक आणि आधुनिक फेशिया, उत्कृष्ट ग्रिपसाठी एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले गोल हँडल आणि अंतर्गत रचना उंचावण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण लेदर मॅट आहे.
 गोखले म्हणाले, ‘कोल्हापूर ही आमच्या व्यवसायासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ असून तिथे आमचे तीसहून अधिक चॅनल पार्टनर्स आहेत. त्यात रिटेलर्स आणि डीलर्स देखील आहेत. आता येथे प्रत्यक्ष आउटलेट्स सुरू करून आम्ही आमचा ठसा विस्तारत आहोत.’
 ………..
सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन
अॅक्यूगोल्ड हे सर्वात प्रगत आणि अचूक सोन्याची शुद्धता तपासणी करणारे मशीन आहे. चाचणी केली जात असलेल्या कोणत्याही दागिन्यातील अचूक मिश्रण, घटक पदार्थ सांगण्यासाठी अॅक्यूगोल्ड डिझाइन केले गेले आहे. विशेष म्हणजे हे करताना कोणत्याही प्रकारे दागिना खराब होत नाही. त्यामुळे सोन्याची शुद्धता ठरविण्यासाठी सर्वोच्च अचूकतेची खात्री हवी असलेल्या ज्वेलर्स, बँका आणि वित्तीय संस्थांसाठी हा परिपूर्ण पर्याय आहे.