+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule14 Oct 24 person by visibility 24 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपआयुक्त (विकास) तथा विभागस्तरीय तपासणी समितीचे सदस्य सचिव विजय मुळीक यांनी कळविली आहे.
विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायतींची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, प्रभारी उपसंचालक (माहिती), पुणे वर्षा पाटोळे, सहाय्यक आयुक्त विकास, पुणे डॉ.सोनाली घुले यांचा समितीमध्ये समावेश होता.
विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार विभागस्तरीय पारितोषिकासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायती व बक्षिसाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम (१२लक्ष), सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव द्वितीय (९ लक्ष) आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कवठे ग्रामपंचायतीला तृतीय (७ लक्ष) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक पुरस्कार-घनकचरा सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सांडगेवाडी ग्रामपंचायतीला पाणी व गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील गोयेगाव ग्रामपंचायतीला स्व.आबासाहेब खेडेकर (शौचालय व्यवस्थापन) प्रत्येकी ७५ हजार रुपये रकमेचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे असेही  मुळीक यांनी कळविले आहे.