+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule14 Oct 24 person by visibility 17 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यॅूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेचा यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ कन्नन गिरीश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा उपस्थित होते.
   घोडावत यांनी पश्चिम महाराष्ट्र व बेळगाव येथे शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण इथे घेता येते.येथील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. उत्कृष्ट प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. आहेत. संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही येथील विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवत आहेत. स्कूल, विद्यापीठ यांच्यामार्फत सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर घालून दिला आहे.
        या पुरस्काराबद्दल बोलताना अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले,  विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. विद्यार्थी व पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे यश मिळाले आहे.जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आणणेचे आमचे प्रयत्न आहेत. या यशाचे श्रेय विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी, संचालक श्री वासू ,संचालक-प्राचार्य सस्मिता मोहंती, इतर सर्व डीन, प्राचार्य,प्राध्यापक, कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे आहे.