सॅटर्डे क्लबचा उद्योगरत्न पुरस्कार मौर्या ग्रुपच्या मंगेश पाटील यांना जाहीर
schedule20 Aug 25 person by visibility 97 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सॅटर्डे क्लब, ग्लोबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार उद्योगपती व मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मंगेश पाटील यांना जाहीर झाला आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक अशोक दुगाडे यांच्या हस्ते आणि पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम हॉटेल फर्न येथे शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५ ) दुपापरी तीन वाजता होणार हा पुरस्कार वितरण समारंभ आहे. यावेळी बेस्ट सेंटर्डे क्लब मेंबर पुरस्कार देखील वितरित करण्यात येईल. याप्रसंगी सॅटर्डे क्लबचे सुहास फडणीस, केदार साखरे, योगेश देशपांडे, दिपा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. कोल्हापूर चाप्टर तर्फे दिल्या जाणाऱ्या उद्योगरत्न या पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे.