पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
schedule22 Dec 24 person by visibility 53 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दिल्ली येथे फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
सरहद, पुणे आयोजित या संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी स्वीकृती दिली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधीची माहिती भारतीय साहित्य महामंडळाला दिली आहे.
महामंडळाच्या अध्यक्षा अध्यक्षा उषा तांबे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. कार्यक्रमाचे स्थळ ,स्वरूप, वेळ तसेच इतर रूपरेषा महामंडळ, संयोजक संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर लवकरच जाहिर केली जाईल असेही प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे.