Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ तवैद्यकीय सेवेबद्दल सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मानमहाडिकांकडून नविद मुश्रीफांचे अभिनंदन, विरोधकांवर निशाणा !अध्यक्ष महायुती की महाविकासचा ? नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळात हम सब एक है, सहकार हा आमचा धर्म !कोल्हापूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक, रेल्वे प्रकल्पासह सर्किट बेंचसंबंधी चर्चा!गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ ! निवडीनंतर म्हणाले गोकुळची गाडी वापरणार नाहीजागा उपलब्ध झाल्यास कोल्हापुरात ३५० खाटांचे सेवा रुग्णालय उभारू-प्रकाश आबिटकरअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

जाहिरात

 

ऑनलाइन फसवणूक, कोल्हापुरातील प्राध्यापिकेकडून साडेतीन कोटी उकळले

schedule29 May 25 person by visibility 132 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा. डॉ. मीना मुरलीधर डोंगरे यांना डिजिटल अरेस्टची भिती घालून तब्बल तीन कोटी ५७ लाख २३ हजार रुपये उकळले आहेत. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फसवणुकीचा हा ऑनलाइन प्रकार केला आहे. २८ एप्रिल ते २७ मे २०२५ या कालावधीत चौदा वेळा रक्कमा उकळल्या आहेत. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंगरे पती-पत्नी हे शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत.

तिघा तोतयांनी व्हॉटसअॅप कॉल करुन ‘मनी लाँडरिग प्रकरणात तुमचे नाव आहे. तुम्हाला केव्हाही अटक होऊ शकते. तुमच्या आधारकार्डद्वारे माहिमच्या बँकेत अनोळखी व्यक्तीकडून सहा कोटी रुपये जमा आहेत. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे.’अशी भीती घातली. व्हॉटसअॅप केलेल्या तिघांनीही अधिकाऱ्यांच्यासारखा गणवेश परिधान केला होता. शिवाय त्यांनी, डोंगरे यांना अटक टाळण्यासाठी आम्ही कळविलेल्या बँक खात्यावर रक्कम जमा करा असे बजावले. त्यांनी नऊ वेगवेगळया मोबाइल क्रमांकावरुन डोंगरे यांच्याशी संपर्क साधला. पैसे पाठविले नाही तर घरी येऊन अटक करू अशी धमकी दिली.

अटकेच्या भीतीने डोंगरे यांनी महिनाभराच्या कालावधीत चौदा वेळेला रक्कम पाठविली. रक्कम पाठविण्यासाठी प्राध्यापिकेने बँकेतील ठेव पावत्याही मोडल्या.  डोंगरे यांची मुलगी डॉक्टर आहे. दोन दिवसापूर्वी त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी, आईंना घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्यात आल्या. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची भेट घेतली. पोलिसात फिर्याद दाखल केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes