नृसिंह गोंविदा पथक ठरला युवाशक्ती दहीहंडीचा विजेता ! ३८ फुटांवरील दहीहंडीसाठी सातव्या थराचा थरार !!
schedule24 Aug 25 person by visibility 811 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोविंदा रे गोपालाचा जल्लोष, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकातील जल्लोष, एकावर एक मानवी मनोरे रचत होणारी प्रयत्नांची पराकाष्ठा…क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा अशा जल्लोषी वातावरणात रंगलेल्या धनंजय महाडिक युवाशक्तीची पश्चिम महाराष्ट्रातील मानाची दहीहंडी शिरोळ तालुक्यातील कुटवाड येथील नृसिंह गोविंदा पथकाने फोडली.रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नृसिंह गोविंदा पथकाने सात थर रचत ३८ फुटावरील दहीहंडी फोडली आणि मैदानात एकच जल्लोष झाला.
येथील दसरा चौक मैदानावर रंगलेल्या दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने साहस, संघटितपणा, समन्वय आणि एकग्रता याचे दर्शन घडले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये तीन तासहून अधिक वेळ हा दहीहंडीचा जल्लोष आणि थरार पाहावयास मिळाला. विजेत्या संघाला तीन लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले. दहीहंडी फोडणारा राजवर्धन पाटील हा गोविंदा साऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित दहीहंडी स्पर्धा यंदाही लक्षवेधी ठरली. धनंजय महाडिक युवाशक्ती व भारतीय जनता पक्षातर्फे या दहीहंडीचे आयोजन केले होते.
खासदार शाहू महाराज, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, प्रा. जयतं पाटील, सम्राट महाडिक, भागिरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उत्तम पाटील, इंद्रजीत जाधव, सागर बगाडे, राजेंद्र बनसोडे, विजय टिपुगडे,अनंत यादव, विनायक सुतार यांनी काम पाहिले.