Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवकालीन बारा किल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन ! पन्हाळा, रायगड, प्रतापगडचा समावेश शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागरमहानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशनआई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!शिक्षक - संस्था चालकांनी उगारली आंदोलनाची छडी ! अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात कोल्हापुरात जंगी मोर्चा !!कोल्हापुरात वंध्यत्व विषयक दोनदिवसीय कार्यशाळानूतन मराठी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरीपाचवी शिष्यवृत्ती, आठवी एनएमएमएस परीक्षेसंबंधी शिक्षकांसाठी कार्यशाळाजरगनगरातील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाकोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर बनविण्यासाठी प्लॅनिंग-जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

आई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!

schedule11 Jul 25 person by visibility 127 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शुक्रवारी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईदेवीला साकडे घालण्यात आले. "  आई अंबाबाई शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे, शेतकऱ्यांची शेती वाचू दे" अशी प्रार्थना करण्यात आली. शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने अनुक्या पद्धतीने महामार्गाला विरोध करण्यात आला.
 माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंबाबाई मंदिर येथे देवीला साकडे घालण्यात आले. भवानी मंडप येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन संघर्ष विरोधी समितीचे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते अंबाबाई मंदिराकडे मार्गस्थ झाले. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेती आमच्या हक्काची, शेती वाचवा - शेतकरी वाचवा अशा घोषणा देत सगळेजण अंबाबाई मंदिरात दाखल झाले. या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली. शक्तिपीठ महामार्ग झाला तर कोल्हापूर शहराला व जिल्ह्याला महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांची शेती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, माजी उपमहापौर संजय मोहिते, भूपाल शेटे,  मधुकर रामाणे, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड, विनायक फाळके, तौफिक मुलाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल घाटगे, सुनील देसाई, काँग्रेसचे संपतराव चव्हाण पाटील, प्रमोद बुलबुले, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, राजेंद्र साबळे, शिवानंद बनछोडे, विनायक घोरपडे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, प्रवीण पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, युवराज गवळी, रियाज सुभेदार, फिरोज सौदागर, चंद्रकांत भोसले, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, शिवसेनेचे राजू यादव, सागर साळोखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes