रविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा ! महापालिकेडून नियोजन सुरू !!
schedule29 Aug 25 person by visibility 114 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापर : कोल्हापूर शहराला रविवारपासून (३१ ऑगस्ट २०२५) दैनंदिन पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. शिंगणापूर मधून ए, बी व ई वॉर्डमधील राजारामपूरी सेक्शन, बालिंगामधून सी व डी वॉर्डला व काळम्मावाडी योजनेमधून कसबा बावडा तसेच संलग्न ई वॉर्डाला एकाच वेळी दैनंदिन पाणी पुरवठा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. तरी शहरातील नागरीकांनी दुरुस्तीची कामे पुर्ण होईपर्यंत पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणा-या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधून दोन पंपाद्वारे सध्या शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पाणीपुरवठा थोड्या कमी दाबाने होत असल्याने शहरांमध्ये मागील दोन दिवसापासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. काळम्मावाडी येथील उर्वरीत दोन पंपापैकी एका पंपामध्ये जो तांत्रिक दोष आहे. त्याकरीता महापालिकेने व जीकेसी कंपनीने ज्या कंपनीचे पंप व सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहेत. त्या एबीबी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. या कंपनीचा टेक्निकल इंजिनिअर शनिवारी सकाळपर्यंत काळम्मावाडी येथे दाखल होणार आहे. या इंजिनिअरद्वारे जो तांत्रिक दोष आहे त्याची तपासणी करुन कंपनीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
दरम्यान शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील 33 केव्ही सब स्टेशन दुरुस्तीचे काम पुर्ण करुन घेण्यात आलेले आहे. शनिवारी दुपारपर्यंत शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ट्रॉन्सफॉर्मची हिटींग करुन पंपिग स्टेशनची चाचणी घेण्यात येणार आहे. सायंकाळी शिंगणापूर येथून पाणी पुरवठा सुरु करण्याचे नियोजन केले आहे.