सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षेत तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
schedule22 Dec 24 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड ,इचलकरंजी तसेच कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातून बारावी विज्ञान शाखेतील ११० महविद्यालयांमधून ३०८५ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
गणितातील प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षांपासून ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून या विषयाची आवड निर्माण व्हावी व पुढील परीक्षांचा उत्तम पाया रचला जावा यासाठी हि परीक्षा घेतली जाते.
परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेनंतर होणाऱ्या एमएचटी-सीईटी क्रॅश कोर्सला सहभाग नोंदवण्यासाठी सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेनंतर आयआयटीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले व गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्स देण्यात आल्या.
डी वाय पी ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी परिक्षास्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाला संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने,प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.