राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती, जय शिवराय मंडळाचा देखावा ठरणार आकर्षण
schedule23 Aug 25 person by visibility 225 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने यंदाही आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राची लोकसंस्कृती: वासुदेव हा हलता तांत्रिक देखावा साकार केला आहे. गेले आठ दिवस सदर देखावा जोडण्याचे काम अहोरात्र सुरू आहे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून हा देखाना पाहण्यासाठी खुला असेल अशी माहिती मंडळाचे कार्यवाहक धनराज माने,कार्याध्यक्ष विनित कागले अध्यक्ष तेजस जगताप उपाध्यक्ष मीत कागले सचिव धनंजय गाडगीळ यांनी सांगितले आजपर्यंत राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे देखावे सादर केले आहेत याबद्दल विविध पुरस्काराने म्हणाला गौरवण्यात आले आहेत. यंदा तयार केलेला देखावा साडेतीन मिनिटांचा असून बहुतांशी हालचाली इलेक्टीक मोटर पंपवर होणार असून आत्ता पासून गल्लीमध्ये देखाव्याचे जोड काम पाहण्यास गर्दी होत आहे लहान मुलांपासून वयोवृध्दापर्यंत देखाव्याचे आकर्षण ठरेल असे मंडळाने म्हटले आहे. मंडाळाने यंदा मंडपातच खेडेगाव बसवले आह. शेतकरी कुटुंब, वासुदेवाचे आगमन, त्याला घरातील धान्य दान स्वरूपाचा देतात वासुदेव तीस फूट फिरत गावातील प्रत्येकाच्या दारात जातो अशा पद्धतीचा हा तांत्रिक देखावा आहे.