शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी जनसुराज्यचे प्रा.बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अपर्णा पाटील
schedule05 May 25 person by visibility 224 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा. बाबासाहेब शंकरराव शिंदे ( माजगाव पैकी शिंदेवाडी) यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अपर्णा अमित पाटील (वरणगे) यांची निवड झाली. भवानी मंडप परिसरातील शेतकरी संघाच्या मुख्य कार्यालयात सकाळी 11 वाजता नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली.
शेतकरी संघाच्या संचालक मंडळांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देताना संचालकांनी, "अध्यक्ष व उपाध्यक्षांनी शेतकरी संघासाठी वेळ द्यावा. साऱ्यांना बरोबर घेऊन काम करावा. नेते मंडळींनी शेतकरी संघ वाढला पाहिजेत अशा सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने साऱ्यांनी काम करू या." अशा भावना व्यक्त केले.
अध्यक्षपदासाठी जनसुराज्यकडून प्रा. शिंदे व संचालक प्रधान पाटील हे इच्छुक होते. तर उपाध्यक्ष पदासाठी अपर्णा पाटील हे इच्छुक होते. शेतकरी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसंबंधी जिल्ह्यातील नेते मंडळींची रविवारी चार मे रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित झाली. सोमवारी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी शेतकरी संघाच्या मुख्य कार्यालयात संचालकांची बैठक झाली. सहकार खात्यातील उपनिबंधक प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दरम्यान नेते मंडळींनी बंद पाकिटातून अध्यक्ष व उपाध्यक्षांची कळवलेली नावे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी प्रा. शिंदे यांच्या उमेदवारीला संचालक प्रवीणसिंह पाटील हे सूचक तर संचालक राजसिंह शेळके हे अनुमोदक होते. उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार अपर्णा पाटील यांच्या नावाला संचालिका रोहिणी पाटील या सूचक तर संचालक आनंदा बनकर हे अनुमोदक आहेत. या बैठकीला संचालक अमरसिंह माने, सर्जेराव देसाई ,अजित मोहिते दत्तात्रय राणे गणपती पाटील आप्पासो चौगुले दत्ताजीराव वारके सुभाष जामदार विजयसिंह युवराज पाटील प्रधान पाटील जयकुमार मुनोळी परशुराम कांबळे सुनील मोदी, कार्यकारी संचालक ए आर मुल्ला, चिटणीस जावेद मुलानी आदी उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना अध्यक्ष प्रा शिंदे म्हणाले, शेतकरी संघाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवू