एकेका गावात तीन-तीन शाळांची मंजुरी, फसवाफसवीत कोण आघाडीवर शोध घ्यावयास हवा-आमदार विनय कोरे
schedule04 May 25 person by visibility 243 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘एकेका गावात तीन-तीन शाळांची मंजुरी पाहून या फसवाफसवीत कोण आघाडीवर होते याचा शोध घ्यावयास हवा.’ असे सडेतोड मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन वाठार तर्फ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कृती सत्राचे आयोजन केले होते. या कृतीसत्रात विविध शैक्षणिक विषयांचा जागर करण्यात आला. या कृतीसत्रात बोलताना आमदार कोरे यांनी, ‘काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना तंत्रसिद्ध शिक्षण देण्यात मुख्याध्यापक संघाने पुढाकर घ्यावा.’असे आवाहनही केले.
दरम्यान कृतीसत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी हे कृती सत्र राज्याला दिशादर्शक ठरेल असे सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे म्हणाले ‘शिक्षकाला मोठं करण्यात मुख्याध्यापकाचा हात असतो. पाठयपुस्तकाशिवाय अन्य साहित्य वाचणारा शिक्षक संशोधनाअंतीच सापडतो. शालेय शिक्षण ज्यावेळी जीवन शिक्षण होईल त्याचवेळी शिक्षण सार्थकी लागेल’ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवीन आव्हानांना मुख्याध्यापकांनी सामोरे जावे असे नमूद केले. आमदार अशोकराव माने यांनी शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवू असे सांगितले.
आमदार विनय कोरे यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहूल पोवार यांनी केला. शिक्षक नेते दादसाहेब लाड, कृती समितीचे अध्यक्ष बाबा पाटील यांचा सत्कार मिलिंद पांगिरेकर यांनी केला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील विजेत्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार झाला. शिक्षक नेते लाड यांनी आपल्या मनोगतात कृतीसत्र दोनदिवशीय असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या उपक्रमाचा आणि कार्याचा आढावा घेतला. मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष बी.जी. बोराडे, विना अनुदान कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे, आर . वाय मोरे कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सागर चुडाप्पा, संजय पाटील, जितेंद्र म्हैशाळे यांच्या जिल्ह्यातील सातशेहून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते. सागर माने यांनी सूत्रसंचालन केले