प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शिका पुस्तक विद्यापीठ- कॉलेज प्रशासन चालवण्यास उपयुक्त ठरेल – कुलगुरू डी. टी. शिर्के
schedule03 May 25 person by visibility 37 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ प्रशासकीय कामकाज करताना पी. डी. चौगले लिखित ‘विद्यापीठ व महाविद्यालयीन प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शिका हे पुस्तक विद्यापीठ व कॉलेज चालविण्यासाठी उपयुक्त ठरेल.’असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले.
या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात कुलगुरू शिर्के बोलत होते. प्रकुलगुरू पी. पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही.एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी बोलताना शिर्के म्हणाले, ‘ही मार्गदर्शक पुस्तिकाजवळ असल्यास कोणतेही काम करणे अवघड जाणार नाही. नोकरी लागल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व नियम, शासन निर्णय व परिपत्रके यासर्व गोष्टी. बिंदूनियमावली पासून ते २००५ नंतर सेवेमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील त्याच्या सेवा समाप्तीच्या वेळेला एसआयपी मधून किती रक्कम मिळणार त्याचे सर्व बारकावे यामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक कॉलेजने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे.
प्रकुलगुरू पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिंदे यांनी या मार्गदर्शक पुस्तिकेमुळे प्रशासनाला मदत होईल, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी मॅनेजमेंट कौन्सिलचे मेंबर न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील यांनी चौगुले यांच्या मार्गदर्शक पुस्तिकेमुळे प्राचार्य वर्गाला दिलासा मिळेल, अशा भावना व्यक्त केल्या. कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अनिल घाटगे यांनी प्रास्ताविक केले. प्रशासकीय सेवक एस. आर. कुंभार यांनी आभार मानले. यावेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, उपप्राचार्य डॉ.आर.डी.धमकले, ग्रंथपाल डॉ. आर.पी.आडाव, डॉ.एन.व्ही.पवार, चेतन पाटोळे, एस. पी.माने, सागर बस्ताडे, धनंजय पाटील, मोहन पाटील, विजय शितोळे आणि सुरेश उपलाने उपस्थित होते.