सतेज पाटलांची सरकारवर बोचरी टीका, निवडणुकीनंतर लाडकी बहिण राज्य सरकारला सावत्र झाली
schedule03 May 25 person by visibility 95 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली आहे. अशी टिका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. हॉटेल सयाजी येथील एका कार्यक्रमानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलेल आहे. राज्याचे बजेट आल्यानंतर साठ टक्के निधी खर्च करा असा पहिला जीआर आला. याचवेळी बजेटला कात्री लागली आहे. अद्याप लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. आता तर सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीच म्हणत आहेत. माझा विभाग बंद करा .एवढ मोठ वक्तव्य मंत्रीच करत असतील तर महाराष्ट्राची आर्थिक घडी किती विस्कटली आहे. हे महाराष्ट्राला दिसत असल्याची टीका त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन २१०० रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, १५०० रूपये देखिल महिलांना वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळं लाडकी बहीण निवडणुकीनंतर राज्य सरकारला सावत्र झाली आहे. अशी जोरदार टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमावरही आमदार सतेज पाटील यांनी जोरदार निशाणा साधला. विकास कामांवर निधी खर्च केला म्हणजे शंभर दिवस व्यवस्थित गेले असे नाहीत. नेमकं लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाच आहे.. शेतकऱ्यांचे लोकांचे प्रश्न आज देखील तोंड आवासून उभे आहेत...स्वतः सर्व्हे करायचा आणि स्वतःची पाठ थोपटून घेणे याला काही अर्थ नसल्याचं त्यांनी सांगितलं.