बारावीचा निकाल पाच मे रोजी ! मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी एक वाजता निकाल उपलब्ध !!
schedule04 May 25 person by visibility 88 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च २०२५ मधील बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी (पाच मे २०२५) जाहीर होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, लातूर, अमरावती आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा झाली होती.
निकाल पाहण्यासाठी https://results.digilocker.gov.in तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. http://hscresuil.mkcl.org तसेच https://results.targetpublications.org येथेही निकाल उपलब्ध आहेत असे मंडळाने म्हटले आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यानी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि निकाल पाहावा असे आवाहन मंडळाने केले आहे. गुणपडताळणी, छायाप्रती व पुनर्मूल्यांकनाच्या अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क साधावा असे म्हटले आहे. यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत झाली होती.