बार असोसिएशनच्या निवडणुकीत सत्तारुढ व्ही. आर. पाटील पॅनेलचा विजय ! पंधरापैकी नऊ जागा जिंकल्या !!
schedule04 May 25 person by visibility 576 categoryउद्योग
आनंदराव जाधव पॅनेलला सहा जागा, कुणकेकर पॅनेलच्या पदरी निराशा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत सत्तारुढ पॅनेलने विजय मिळवला. सत्तारुढचे प्रमुख उर्फ व्ही. आर. पाटील पॅनेल हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पंधरा पैकी नऊ जागा जिंकल्या. अॅड. आनंदराव जाधव पॅनेलला सहा जागा मिळाल्या. तर अॅड. सतीश कुणकेकर पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्ही. आर. पाटील (९७६ मते) यांनी अॅड. आनंदराव जाधव (७४० मते) व अॅड. सतीश कुणकेकर (५१४ मते) यांचा पराभव केला. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर झाला. निकालानंतर सत्तारुढ पॅनेल समर्थकांनी न्याय संकुल परिसरात गुलालाची उधळण केली.
बार असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा तीन पॅनेल होते. २९४० मतदारांपैकी २२४९ सभासद मतदारांनी मतदान केले. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत कसबा बावडा रोडवरील न्याय संकुलातील दोन केंद्रावर मतदानाची सोय होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. सुभाष पिसाळ यांनी काम पाहिले. रात्री नऊनंतर निकालाचे कल समजू लागले. व्ही. आर. पाटील पॅनेलने पंधरापैकी नऊ जागा जिंकल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्ही. आर. पाटील विजयी झाले. सत्तारुढ पॅनेलमधून उपाध्यक्षपदी तुकाराम शंकर पाडेकर यांनी ११३५ इतकी सर्वाधिक मते घेत विजयी ठरले. लोकल ऑडिटर प्रमोद प्रकाश दाभाडे यांना १०४४, महिला प्रतिनिधी गटात मनिषा हिम्मतराव सातपुते यांना ९३४, कार्यकारिणीमध्ये वैष्णवी विशाल कुलकर्णी यांना ९५८, वैभव रावसाहेब पाटील यांना १०८२, मीना विद्यानंद पाटोळे यांना ९८५, सम्राज्ञी युवराज शेळके यांना १००९, प्रीतम श्रावण पातले यांना ९१७ मतांनी विजयी झाले.
अॅड. आनंदराव भाऊसाहेब जाधव पॅनेलमधून सचिवपदाचे उमेदवार मनोज मोहन पाटील हे ९१३ मते घेत विजयी झाले. याच पॅनेलमधील सहसचिवपदाचे उमेदवार सूरज राजकुमार भोसले यांना ८८४, कार्यकारिणी सदस्यांमध्ये स्वप्नील सुनील कराळे यांना ७२४, स्नेहल भीमराव गुरव यांना ९०३, हंसिका अजित जाधव यांना ९००, निखिल राजाराम मुदगल ८२० मते प्राप्त करत विजयी झाले.
………….
पराभूत उमेदवार व प्राप्त मते…
उपाध्यक्षपदाच्या लढतीत पराभूत उमेदवारांमध्ये जाधव पॅनेलचे उमेदवार संदीप जाधव ७२८ मते, कुणकेकर पॅनेलच्या रेखा भोसले यांना ३७० मते मिळाली. सचिवपदाच्या लढतीत पराभूत उमेदवारांत पाटील पॅनेलचे अॅड. प्रशांत पाटील यांना ८२५, कुणकेकर पॅनेलचे सुर्यदीप भोसले यांना ४९५ मते मिळाली. सहसचिवपदाच्या लढतीत पाटील पॅनेलचे उमेदवार रोहन साळोखे यांना ७८४ मते, कुणकेकर पॅनेलचे उमेदवार अमोल नाईक यांना ५६० मते मिळाली. लोकल ऑडिटरपदाच्या लढतीत जाधव पॅनेलचे उमेदवार धीरज शिंदे यांना ८०६, कुणकेकर पॅनेलचे उमेदवार परवेज पठाण यांना ३७५ मते मिळाली. महिला प्रतिनिधी गटातील लढतीत जाधव पॅनेलच्या उमेदवार स्वाती मोहिते यांना ७३५ मते, कुणकेकर पॅनेलच्या उमेदवार दीपा गुरव यांना ५५२ मते मिळाली.