बिंदू चौकात घुमला इंडिया आघाडीचा नारा, केंद्रीय मंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी !
schedule22 Dec 24 person by visibility 59 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीतर्फे कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या बिंदू चौकात धरणे आंदोलन झाले. रविवारी झालेल्या या आंदोलनात इंडिया आघाडीतर्फे गृहमंत्री अमित शहा यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी झाली. तसेच, २९ डिसेंबर रोजी, दसरा चौक ते माणगावपर्यंत संविधान रॅली काढण्याचा निर्णय घोषित केला. त्यादिवशी दसरा चौकातून सकाळी दहा वाजता रॅलीला सुरुवात होईल.
प्रारंभी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांची प्रतिमा आणि संविधानसह ‘जय भीम’चा नारा दिला. जयघोष करण्यात केला. या आंदोलनात इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. खासदार शाहू महाराज यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. शहा यांचे वक्तव्य चुकीचे आणि निषेधार्ह असल्याचे सांगितले.
आंदोलनात माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी शशांक बावचकर, शिवसेनेचे सहसंपर्कविजय देवणे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, अतुल दिघे, शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम. डी जी भास्कर, शिवाजीराव परुळेकर, व्यंकाप्पा भोसले, प्रा टी. एस. पाटील, राजवैभव कांबळे, अनिल लवेकर, बबन रानगे, ॲड सुभाष देसाई, दिलदार मुजावर, इरशाद फरास, बाळासाहेब भोसले, साथी हसन देसाई आदींचा सहभाग होता.
………………….
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अनुदगार काढून इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे.अशा प्रकारचा कुटिल डाव देशातील जनतेला कधीच मान्य होणार नाही. महापुरुषांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास रचायचा हे भाजपाचे षडयंत्र सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केले.त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा.”
- सतेज पाटील, आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष