Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
श्यामकान्त जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीरकोल्हापुरात रविवारी ब्रह्मऊर्जा उद्योग परिषद !  शिरीष बेरी, प्रमोद पुरोहित, दिलीप गुणे, पद्माकर सप्रेंना पुरस्कार!!भारतीय मजदूर संघांच्या पदाधिकाऱ्यांची कामगारमंत्र्यांच्यासोबत बैठकशनिवारी उलघडणार कोल्हापुरची कुस्ती परंपरा, पैलवान संग्राम कांबळेंचे व्याख्यानश्रीवर्धन बनसोडेची राष्ट्रीय बेसबॅाल स्पर्धेसाठी निवडस्मिता गौड यांच्या माझे शाळेतील प्रयोग या पुस्तकास लक्षवेधी ग्रंथ पुरस्कारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये नव संकल्पपित तंत्रज्ञान प्रकल्पाचे सादरीकरणशिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडीनेमबाजी स्पर्धेत विवेकानंदच्या ज्ञानेश्वरी पाटीलला सिल्वर मेडलगारगोटीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव

जाहिरात

 

माजी महापौर मारुतराव कातवरेंचा अमृत महोत्सवानिमित्त रविवारी नागरी सत्कार

schedule08 Jan 25 person by visibility 75 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : माजी महापौर मारुतराव कातवरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी, 12 जानेवारी रोजी नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. याप्रसंगी अमृतकलश गौरव विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे अशी माहिती नागरी सत्कार सोहळा समितीतर्फे माजी महापौर महादेवराव आडगुळे व प्राचार्य प्रकाश कुंभार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी दहा वाजता हा समारंभ होणार आहे. खासदार शाहू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, कुंभार विकास सामाजिक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सतीश दरेकर उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्या हस्ते कातवरे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी  कातवरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.
 कातवरे यांनी 1991 - 92 पासून सलग तीन वेळेला नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. 1991 ते 2004 या कालावधीत त्यांनी पक्षप्रतोद, उपमहापौर व महापौर अशी पदे भूषविली. 17 मे 2003 रोजी त्यांची कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली होती. महापौर पदाच्या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून पंचगंगा प्रदूषण प्रश्नासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तसेच राज्य सरकारकडून शहर विकासासाठी 75 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. कुंभार समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला. कोल्हापुरात त्यांनी पुढाकार घेऊन कुंभार समाजाचे राज्य अधिवेशन घेतले. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.
 पत्रकार परिषदेला माजी महापौर आर के पोवार, सतीशराव कुंभार, अनिल घाटगे, सुनील देसाई, दीपराज माजगावकर, सुरेश कुरणे, गणेश जाधव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes