धनंजय महाडिक युवाशक्तीच्या दहीहंडीचा रविवारी थरार ! उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देणार !!
schedule23 Aug 25 person by visibility 381 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी (२४ ऑगस्ट २०२५) दसरा चौक येथे दहीहंडी आयोजित केली आहे. सायंकाळी चार वाजता दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. उच्च-तंत् शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे युवाशक्ती दहीहंडीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बक्षिसं दिली जातील. पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणार्या गोविंदा पथकाला, प्रोत्साहन म्हणून ५ हजार रूपये दिले जातील. तर सहा थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १० हजार रूपये आणि सात थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय सलामीला ८ थर लावणार्या गोविंदा पथकांना विशेष पारितोषिक म्हणून ५० हजार रुपये दिले जातील. प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.