Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार    महापालिका कर्मचारी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावरगणेशोत्सव कामासाठी गैरहजर राहिल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई, महापालिकेने काढला आदेशप्लास्टिक मुक्तीचे मॉडेल ! १०० दिवसात प्लास्टिक दूर... नक्की करणार आमचं कोल्हापूर!!डीवायपी ग्रुपचे ध्येय, जगातील टॉप ५०० विद्यापीठात स्थान ! कोल्हापुरात सर्वात उंच २३ मजली इमारत उभारणार!!गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच डीवाय पाटील विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी - लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयलपाइपलाइन योजनेवरुन काँग्रेस-भाजपमध्ये वाकयुद्ध, काँग्रेसच्या चर्चेच्या आव्हानाला जयंत पाटलांचे प्रत्युत्तरसेवानिवृत्त सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबारअयोध्या फाउंडेशन शिंगणापूरतर्फे मुंबईकडे शिदोरी रवानाआंदोलनासाठी जमलेले मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

जाहिरात

 

आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर आता जिल्ह्यात  स्वच्छ - सुंदर घर अभियान -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule11 Aug 25 person by visibility 225 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आजवर कोल्हापूर जिल्ह्यात सुरु झालेले अनेक उपक्रम राज्यात राबवले गेले आहेत. दूध उत्पादन वाढ व स्वच्छ दूध निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात सुरु झालेल्या उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा व आदर्श गोठा पुरस्काराचा आदर्श राज्यभरातील पशुपालकांनी घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन जिल्हा स्तरावर अनुक्रमे ४१, ३१ व २१ हजारांचे तर तालुका स्तरावर २१, १५ व दहा हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. तसेच आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर आता जिल्हा परिषदेच्या वतीने 'स्वच्छ सुंदर घर अभियान' राबवण्यात येणार असून या अभियानातही जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी व स्वच्छ दूध निर्मिती प्रोत्साहनासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कार २०२४ - २५चा वितरण सोहळा पार पडला. सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. महेश शेजाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, डॉ. सॅम लुद्रीक, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे आदी उपस्थित होते. सर्व तालुक्यातील पुरस्कार प्राप्त बारा पशुपालकांना पालकमंत्री श सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पुरस्काराच्या रुपाने देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री  आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्वच्छ व सुंदर गोठा अभियानंतर्गत रोख पारितोषिकाची तरतूद करणारी केवळ कोल्हापूर जिल्हा परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी या अभियानाबाबत माहिती दिली.

…………

पुरस्कारप्राप्त यादी सुमित मारुती पोवार, वाघापूर, पांडुरंग आनंदा नाईकवाडे पंडेवाडी, आनंदा शिवाजी देसाई तेरणी, कृष्णा ईश्वर पाटील ढोलगरवाडी, मायाप्पा देवल चिगरे टाकळीवाडी, धनाजी बबन पाटील भुयेवाडी, संदिप एकनाथ पोवार सिध्दनेर्ली, शिवाजी शामराव वडींगेकर कातळेवाडी, यशंवत कृष्णा पाटील मांडुकली, निलेश शशिकांत फाटक जंगमवाडी, नानासो दत्तात्रय पाटील वाघवे, लता उत्तम रेडेकर,  पेद्रेवाडी.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes