विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना जागृत करणे स्पृहणीय : नितीन वाडीकर
schedule23 Aug 25 person by visibility 69 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना जागृत करण्यासाठी समिधा प्रतिष्ठान व माँ फाउंडेशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय समूह गायन स्पर्धा अत्यंत स्पृहणीय आहेत. अधिकाधिक शाळांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा.” असे प्रतिपादन दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व कारखानदार नितीन वाडीकर यांनी केले.
समिधा प्रतिष्ठान व मा फाउंडेशन आयोजित आंतरशालेय समूह गान स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी ते बोलत होते. र्धेचा शुभारंभ दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्म जागरण गतिविधिचे प्रांत प्रमुख प्रफुल्ल जोशी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन करुन झाले. परीक्षक सविता फाले आणि रोहित फाटक यांनी गुणांकन कसे करणार याबद्दल माहिती दिली. दिवसभर एकूण २१ शाळांच्या संघांनी आपली गीते सादर केली. उठा राष्ट्रवीर हो, सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले, दाही दिशांना जाऊ फिरू, उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे अशी फारशी परिचित नसलेली गीते विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय सुरेल आवाजात सादर केली. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक समिधा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर यांनी केले. देशभक्ती आणि समाज सेवेच्या भावनेने ओतप्रोत असलेली आणि फारशी परिचित नसलेली गीते या स्पर्धेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी निकालांचे वाचन केले. सविता पाटील, दीपा ठाणेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. समिधा प्रतिष्ठानचे सचिव ओंकार गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल देसाई यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी अमित कांबळे, ऋतुराज नढाळे, संतोष जोशी, शुभंकर गोसावी, सौरभ फळणीकर, राज देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.