अखिल भारतीय विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत ज्ञानेश्वरी पाटीलला ब्राॅंझ पदक
schedule09 Apr 23 person by visibility 542 categoryक्रीडा

कोल्हापूर
दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत ज्ञानेश्वरी पाटीलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात ब्राॅंझ पदक पटकावले.
न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजची माजी विद्यार्थिनी व सध्या विवेकानंद कॉलेजच्या बी. एस. सी. कॉम्प्युटर थर्ड इयर मध्ये शिकत असलेली ज्ञानेश्वरी जयवीर पाटीले दहा मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात ब्राॅंझ पदक मिळविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत ज्ञानेश्वरीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तिच्यायशाबद्दल तिचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे, शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी मुरलीधर गावडे. संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे.यांच्यावतीने व विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य .डॉ. कुंभार (सर).जिमखाना विभाग प्रमुख प्रा.किरण पाटील .आणि न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजचे सुपरवायझर प्रा. असिफ कोतवाल .प्रा.अनिल जाधव.प्रा.एस.आर.पाटील. जिमखाना विभाग प्रमुख डॉ.महेश कदम. यांच्या वतीने अभिनंदन. करण्यात आले.तिला राष्ट्रीय प्रशिक्षक संतोष जाधव, विद्यापीठाचे प्रशिक्षक प्रा. विजय रोकडे. आणि आई वडिलांचे प्रोत्साहन लाभले.