विकासकामांच्या शुभारंभाचा हटके अंदाज, रोड रोलर चालवत रस्त्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग
schedule22 Dec 24 person by visibility 409 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विकासकामांचा शुभारंभ, उद्घाटन म्हटलं की गर्दी ठरलेली. श्रीफळ वाढविणं आणि फटाक्यांची आतषबाजी हे सर्रास चित्र पाहावयास मिळतं. दरम्यान कोल्हापुरात रविवारी विकासकामांच्या पाहणीचा हटके अंदाज साऱ्यांना चकीत करुन गेला. तो म्हणजे, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी रोड रोलर चालवत रस्त्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. विविध प्रभागातील रस्त्यांच्या कामाची माहिती घेतली. पूर्ण झालेल्या कामाचा दर्जाचीही तपासणी केली
निमित्त होतं, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी मंजूर करुन आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाच्या शुभारंभाचे. महाडिक यांनी माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विकासकामांची पाहणी केली.
प्रभाग क्रमांक ३९ राजारामपुरी एक्स्टेंशन परिसरात गटार चॅनल रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाल. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, विलास वास्कर, राजसिंह शेळके, भाग्यश्री शेटके, किरण नकाते, करण जाधव, अभिजीत शिंदे, उमा इंगळे, शैलेश पाटील, राहुल जोशी, विराज चिखलीकर, अमर साठे, संगीता खाडे, गिरीश साळोखे उपस्थित होते. शिवाजी उद्यमनगर प्रभागात गटारीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. यावेळी अजित मोरे, मोहन जाधव, अक्षय शिंदे, बाळासाहेब मुधोळकर, प्रणित व्हनाळकर उपस्थित होते. टाकाळा खण, माळी कॉलनीतील रस्त्यांच्या डांबरीकरण, म्हसोबा मंदिर ते राजमंदिर आईस्क्रीम आणि शिंदे घरपर्यंत ९ इंची गटर बांधणी कामाला सुरुवात केली. यावेळी अविनाश भोसले, अभिजीत भोसले, मयूर माने, चेतन शहा, स्वप्नील कुंदनकर, जयराज देसाई उपस्थित होते. यादवनगरमधील अंतर्गत कॉलन्यातील गटार बांधकाम शुभारंभप्रसंगी विशेष कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग रजपूत, रविकिरण गवळी, सुरज पाटील, संदिप साठे, नितीन पाटील उपस्थित होते.
फिरंगाई तालीम जवळील परिसरात गटार बांधकामाचा शुभारंभ उत्तम कोराणे, सचिन पवार, विश्वास पवार, गिरीश साळुंखे, प्रकाश सरनाईक, संग्राम जरग आदींच्या उपस्थितीत झाला. पोलीस लाईन परिसरात ड्रेनेज लाईन, कसबा बावडयातील अंतर्गत बिरंजे पाणंद शाहू सर्कल परिसरात गटर बांधणी होणार आहे. या कामाच्या शुभारंभाप्रसंगी किरण शिराळे, चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे, सचिन पवार, धीरज उलपे, किसन खोत, अमर साठे, प्रदीप मगदूम जी, उपस्थित होते.