पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना पोलिस अधिकाऱ्याला पकडले
schedule05 Jul 25 person by visibility 147 categoryक्रीडाआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अपघात प्रकरणात जप्त केलेले वाहन परत करणे व गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी चाळीस हजार रुपयाची लाच स्विकारताना गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक निता शिवाजी कांबळे यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचत प्रतिबंधक विभागाने, शनिवारी ही कारवाई केली.
या संदर्भातील अधिक माहित अशी, या प्रकरणातील तक्रारदाराच्या मुलाच्या विरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यामध्ये तक्रारदाराचे वाहन जप्त केले होते. ते वाहन सोडविण्यासाठी साठ हजार रुपयांची लाचेची मागणी होत होती. यासंबंधी तक्रारदाराने, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेबसाईटवर तक्रार दिली होती. या तक्रारीच्या पुढील कारवाईसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पोलिस अधीक्षकांनी कोल्हापूर युनीटकडे तक्रार पाठविली होती. त्या अनुषंगाने तक्रारदारांशी संपर्क करून,लाचेच्या मागणीची पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली.
जप्त केलेले वाहन परत करणे, तसेच गुन्हयातील कलमे कमी करून, गुन्ह्याचे कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी, पाच जुलै रोजी पोलिस ठाण्याच्या आवारात तक्रारदारांकडून चाळीस हजार रुपयाची लाच घेताना पकडले. या कारवाईनंतर आरोपीच्या गडहिंग्लज येथील केडीसी बँक कॉलनी येथील घराची तपासणी करण्यात येत आहे.