जिल्हा परिषदेची कामवाटप सभा गुरुवारी
schedule07 Feb 25 person by visibility 157 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील काम वाटप सभा गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) होणार आहे. जिल्हा परिषद इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील कै. वसंतराव नाईक समिती सभागृह येथे दुपारी बारा वाजता सभा आयोजित केली आहे. सभेसाठी जिल्हा परिषद, बांधकाम विभागाकडील नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था आणि सर्वसाधारण कंत्राटदार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी केले आहे.