+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Apr 23 person by visibility 410 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने गारगोटी येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत जिल्हा परिषद जिम्नॅशियमच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे.
गारगोटी येथे ९ एप्रिल रोजी स्पर्धा झाली होती. यामध्ये साक्षी काळेने ६३ किलो वजन गटात सुवर्णपदक व रौप्यपदक जिंकले. दिक्षा दामुगडेने ७४ किलो वजन गटात सुवर्णपदक व रौप्यपदक तर अनुष्का शिंदेने ५३ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. अनिल शिंदे यांनी ७४ किलो वजन गटात सुवर्णपदक, सचिन लाड यांनी ६६ किलो वजन गटात सुवर्णपदक, जतिन शेंडगेने ८३ किलो वजन गटात सुवर्णपदक, निशांत कर्णिकने ८० किलो वजन गटात सुवर्णपदक, अभिनंदन पाटील व रणवीर पोतदार यांनी ७० किलो वजन गटात रौप्य पदक, विशाल दामुगडेने ८३ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक, आरुष शिंदेने ५३ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक जिंकले.
या खेळाडूंचा गुरुवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अधीक्षक अजय शिंदे, अधीक्षक राहूल मोरे, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश म्हाळुंगेकर यांची उपस्थित होती. जिमखाना प्रशिक्षक अनिल शिंदे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले