+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Apr 24 person by visibility 250 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापुरात शनिवारी (२७ एप्रिल ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणारी ही सभा अतिविराट होईल. या सभेला दोन लाखावर गर्दी होईल असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
      सभेच्या नियोजनासाठी कोल्हापुरात हॉटेल पॅव्हेलियनमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस -अजित पवार गट, शिवसेना- एकनाथ शिंदे गट आणि मित्र पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मंत्री  मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
   मुश्रीफ  म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने या दोन्हीही जागा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.
  खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापुरात होत असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ऐतिहासिक होईल. महायुतीतील सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी ही अतिविराट सभा यशस्वी करायचा निर्धार केला आहे. त्यासाठी महायुतीमधील सर्वच घटकांनी समन्वयाने नियोजन करून प्रत्येक तालुकानिहाय या सभेचे नियोजन केले जाईल.
   यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने, समरजीत घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर व धैर्यशील देसाई, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुणराव डोंगळे, सम्राट महाडिक, भूषण पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, भाजपचे महानगर विजय जाधव, शिवसेना शहराध्यक्ष सुजित चव्हाण, विजय जाधव, पी. जी. शिंदे, अशोकराव चराटी, डॉ. संजय पाटील, बाबासाहेब पाटील, एम. पी. पाटील, संतोष धुमाळ, सोमनाथ घोडेराव उपस्थित होते.
...... मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला.........       पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैयक्तिक बदनामी, वादग्रस्त वक्तव्ये आणि चुकीचे आरोप यासारखे मुद्दे टाळले पाहिजेत. यातून आरोप- प्रत्यारोपामुळे या बाजूकडून शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका होईल, असेच हे षडयंत्र दिसते. कोणाशी काही जर धमकीसारखा चुकीचा प्रकार असेल तर संबंधितांनी पोलिसात जाऊन तक्रार द्यावी. त्यासाठी हातात काठी घेऊन बसण्याची काय गरज आहे.?
.................