शिवाजी विद्यापीठात बुधवारी शरण अध्यासनतर्फे कार्यशाळा
schedule10 Mar 25 person by visibility 67 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिववाजी द्यापीठ येथील शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (12 मार्च 2025) सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत भौतिकशास्त्र अधिविभाग सभागृह येथे एकदिवसीय कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेचा मुख्य विषय ‘भारतीय महिला : जात-वर्ग-लिंगभाव जाणीव’ हा आहे. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषवतील. ई. एफ. एल. युनिव्हर्सिटि, हैद्राबादच्या माजी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. माया पंडित आणि सेंट्रल युनिव्हर्सिटि ऑफ कर्नाटका, गुलबर्गा येथील प्रा. डॉ. शिवगंगा रूम्मा या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक असतील. कार्यक्रमात व्याख्याना सोबतच महिला विषयक निवडक आंतरराष्ट्रीय लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. उमेश मालन दिग्दर्शित 'गोल्डन टॉयलेट' हा मराठी लघुपट, फजिल रझाक दिग्दर्शित 'पिरा' हा मल्याळम लघुपट तसेच समता जाधव दिग्दर्शित 'सोच सही, मर्द वही' हा हिंदी लघुपट दाखविण्यात येणार आहे. या लघुपटांविषयी डॉ. अनमोल कोठाडिया उपस्थितांशी संवाद साधतील. या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विवेक वाहिनीचे विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी आणि विवेक वाहिनी, कोल्हापूरच्या जिल्हा कार्यवाह डॉ. चैत्रा राजाज्ञा यांनी केले आहे.