शुक्रवारी जिल्ह्यात महिला आयोग आपल्या दारी ! महिलांनी तक्रारी मांडाव्यात- रुपाली चाकणकर
schedule11 Dec 24 person by visibility 84 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवारी (२० डिसेंबर २०२४ ) होणार आहे. तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोल्हापूर येथे सकाळी अकरा वाजता सुनावणींना सुरुवात होईल. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.