Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चंद्रकांत पाटील उच्च-तंत्रशिक्षणमंत्री, प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री, मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षणज्ञानेश्वर मुळे, विठ्ठलराव याळगींना पुरस्कार ! रविवारी वितरण समारंभ !!डीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुक

जाहिरात

 

चंद्रकांत पाटील उच्च-तंत्रशिक्षणमंत्री, प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री, मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण

schedule21 Dec 24 person by visibility 452 categoryराजकीय

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते मिळणार याकडे नजरा लागून राहिल्या होत्या. शनिवारी (२१ डिसेंबर २०२४) रात्री राज्य मंत्रीमंडळातील ३९ मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. राजभवनकडून घोषणा करण्यात आली.

अतिशय महत्वाचे समजले जाणारे गृहखाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तर वैद्यकीय शिक्षण खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविले आहे. पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समाविष्ठ झालेल्या राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री असतील. आबिटकर यांच्याकडे महत्वाचे खाते सोपविले आहे. महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे.

२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळाकडे लक्ष लागले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मात्र खातेवाटप रखडले होते. शनिवारी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाले. यामध्ये दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षणखाते, पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपविली आहे.  मंत्रीमंडळावर नजर टाकली असता महत्वाची खाती भाजपकडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

……………..

 अन्य मंत्री आणि खातेवाटप पुढीलप्रमाणे : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण, गिरीश महाजन – जलसंपदा, गुलाबराव पाटील –पाणीपुरवठा, गणेश नाईक –वनखाते, शिवेंद्रसिंहराजे भोसले-सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे –कृषीमंत्री,  संजय राठोड – माती व पाणी परीक्षण खाते, मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, उदय सामंत –उद्योग व मराठी भाषा,  जयकुमार रावल-विपणन, अतुल सावे – ओबीसी विकास व दुग्धविकास, अशोक उईके – आदिवासी विकास, शंभूराजे देसाई –पर्यटन-खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, आशिष शेलार –माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे –क्रीडा व अल्पसंख्याक विकास, आदिती तटकरे –महिला व बालविकास, नरहरी झिरवळ –अन्न व औषध प्रशासन, जयकुमार गोरे –ग्रामविकास आणि पंचायत राज, संजय शिरसाट – सामाजिक न्याय, भरत गोगावले – रोजगार हमी व फलोत्पादन, नितेश राणे –मत्स्य आणि बंदरे, प्रताप सरनाईक – वाहतूक, बाबासाहेब पाटील – सहकार, मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन.

………………

राज्यमंत्री पुढीलप्रमाणे : माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल – अर्थ नियोजन आणि विधी, इंद्रनील नाईक –उच्च तंत्रशिक्षण व आदिवासी विकास, मेघना बोर्डीकर –सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण, योगेश कदम –गृहराज्य शहर, पंकज भोयर – गृहनिर्माण.  

 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes