+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 90 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार हा सस्पेन्स कायम आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या आठवर पोहोचली आहे. या मतादरसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटानेही दावा केल्यामुळे ही जागा कोणाकडे जाणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार ठरविण्यासाठी बुधवारी (२३ ऑक्टोबर) इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे इच्छुकांची मते आजमावणार आहेत.
 काँग्रेसकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार जयश्री जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बांधकाम व्यावसायिक आनंद माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, दुर्वास कदम यांनी उमेदवारीसाठी पक्ष निरीक्षकांपुढे मुलाखती दिल्या आहेत. पाच वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रतिनिधीत्व केलेले व भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आर. डी. पाटील हे काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्या पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मुलाखतीवेळी उपस्थित राहिल्या नाहीत. अंतिम टप्प्यात जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हेच उमेदवार असतील अशी चर्चाही काँग्रेसमध्ये आहे.
 शिवसेना ठाकरे गटानेही मेळावा घेऊन कोल्हापूर उत्तरवर दावा केला आहे. शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार हे इच्छुक आहेत. शहरप्रमुखर रविकिरण इंगवले हे निवडणूक लढण्याच्या पावित्र्यात आहे. पवार, इंगवले यांच्यासह शहरप्रमुख सुनील मोदी, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
 राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा
राष्ट्रवादी शरद पवार गटानेही कोल्हापूर उत्तरसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला जाणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी काँग्रेस जागा सोडणार नाही असे चित्र आहे.
……………………..
विद्यमान आमदारांनी मुलाखत दिली पण चर्चा इतरांचीच
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव या विजयी झाल्या. आताच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून श्रीमती जाधव यांनी मुलाखत दिली आहे. मात्र त्यांच्या नावापेक्षा काँग्रेसमध्ये अन्य नावांची चर्चा जास्त आहे. सरप्राइज चेहरा कोण ? हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.