विभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश
schedule23 Oct 24 person by visibility 334 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एसएनडीटी महिला विद्यापीठाने विभागीय स्तरावर आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले. ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात तनुजा संकपाळ या विद्यार्थिनीने रौप्य पदक मिळवले.
सोबतच अमरावती येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी कबड्डी स्पर्धेसाठी दिपाली धनवडे या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड झाली आहे. व्हॉलीबॉल कोचिंग कॅम्पसाठी सानिया पाटील या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. क्रीडा स्पर्धांसाठी संतोष फराकटे, अनिता अथने, प्रज्वल देवर्डेकर यांनी कष्ट घेतले असून विद्यार्थिनींच्या यशासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे.