Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आम्ही पाहिलाय काळ तुमच्या संघर्षाचा…म्हणूनच अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा !! अमल महाडिकविवेकानंद  कॉलेज  कुशल मनुष्यबळ घडविणारे लोकप्रिय महाविद्यालय-प्राचार्य आर. आर. कुंभारविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली मेन राजाराम हायस्कूलला भेटअन् छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजळलाभाजपा कार्यकर्त्यांचा मिरजकर तिकटीला जल्लोषकोल्हापुरात बहरणार ५४ वे पुष्प प्रदर्शन ! महावीर उद्यान येथे विविध कार्यक्रम !!शहाजी कॉलेजच्या खेळाडूंचे विद्यापीठ आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत यश  पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप सातारा-कोल्हापूर पुरुष गटाला विभागूनफोंडाघाटत टँकरला आगविधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस ! मुंबईत घोषणा, कोल्हापुरात आनंदोत्सव !!

जाहिरात

 

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त

schedule22 Oct 24 person by visibility 166 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या पथकांमार्फत तपासणी मोहिम व कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी, बाजार गेट व छत्रपती शिवाजी चौक परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली. यावेळी लक्ष्मीपूरी येथील राम ट्रेडर्स, सनी प्लॅस्टिक, योगेश केसरकर, छत्रपती शिवाजी चौक येथील अंबिका स्वीट बेकर्स, बाजार गेट येथील मुनमुन शॉपी, समीर तांबोळे, सहारा कटलरी या व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लॅस्टीकचा साठा आढळून आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने या सात व्यापा-यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे ३५ हजार रुपये दंड करुन तो वसूल करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्याकडुन 300 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले. ही कारवाई मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, ऋषिकेश सरनाईक, स्वप्निल उलपे, महेश भोसले, भूमी कदम, मुकादम व कर्मचारी यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes