महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे हे गुरुवारी, (२४ ऑक्टोबर २०२४) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आवाडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अशी महायुती आहे. आवाडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या औचित्याने रॅली काढण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुतळा चौक, इचलकरंजी येथून सकाळी ९ वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा इचलकरंजी कार्यालयात त्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. पक्ष निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी स्वागत केले. आमदार प्रकाश आवाडे यांचीही उपस्थिती होती. उमेदवार आवाडे यांनी मंगळवारी, तोडकर मळासह अन्य भागात संपर्क दौरा काढला. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांची कारखाना कार्यस्थळी भेट घेतली.