+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 55 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातील विविध मतदारसंघासाठी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघात शिवसेनेने उमेदवारी घोषित केली आहे. राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर तर करवीर मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना उमेदवारी मिळाली आहे.
 आमदार प्रकाश आबिटकर हे यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून दोन वेळेला निवडून आले आहेत. तर करवीरमधून उमेदवारी जाहीर झालेले चंद्रदीप नरके यांनी २००९ आणि २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती.
सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघात सुहास अनिल बाबर यांना उमेदवारी मिळाली. सांगोला मतदारसंघातून विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना उमेदवारी तर सावंतवाडीतून विद्यमान आमदार व मंत्री दीपक केसरकर यांना उमेदवारी आहे. पाटणमधून शंभूराजे देसाई, कोरेगावमधून महेश शिंदे, महाडमधून भरत गोगावले हे विद्यमान आमदार पुन्हा शिवसेनेकडून मैदानात असतील.