+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule22 Oct 24 person by visibility 324 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विविध मतदारसंघात आजी-माजी आमदार, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज घेतले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. पाटील यांच्यावतीने त्यांच्या प्रतिनिधींनी हा अर्ज घेतला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमल महाडिक यांनीही अर्ज घेतले.       दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात १९ जणांनी ५७ अर्ज घेतले आहेत. करवीरमध्ये ९ जणांनी १३ अर्ज घेतले आहेत. तर कोल्हापूर उत्तरमध्ये १७ उमेदवारांनी २९, हातकणंगलेत ९ जणांनी अर्ज घेतले आहेत. शिरोळमध्ये १८ अर्ज तर इचलकरंजीत वीस जणांनी अर्ज घेतले आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी अर्ज घेतले आहेत.
 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटातर्फे दावा करण्यात आला आहे. अद्याप हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला मिळणार ? हे अजून ठरलेले नाही. महायुतीमध्येही कोल्हापूर उत्तरचा निर्णय झाला नाही. दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी २८ ऑक्टोबरला अर्ज भरणार असल्याचे म्हटले आहे.  कोल्हापूर उत्तरसाठी पहिल्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांची नावे अर्ज नेलेल्यामध्ये आहेत. दक्षिणमध्ये विद्यमान आमदार ऋतुराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, भाजपचे उमेदवार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अर्ज घेतले आहेत. याशिवाय संदीप संकपाळ, साई लाखे यांनीही अर्ज नेले आहेत.
शिरोळ मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रकांत मोरे, एकनाथ माने, स्नेहा देसाई आदींनी अर्ज घेतले आहेत. इचलकरंजी विधानसभेसाठी महायुतीकडून राहुल आवाडे हे गुरुवारी, २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उमेदवारी अर्ज मागे घेतली त्यामध्ये मौशमी आवाडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे, विठ्ठल चोपडे आदींचा समावेश आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी, नऊ इच्छुक उमेदवारांनी सोळा अर्ज नेले. यामध्ये गणेश वाईकर, शिवाजी आवळे, इंद्रजीत कांबळे, राजहंस तुकाराम भुजंगे, अमरजित बंडगर, संदीप कांबळे, आदींचा समावेश आहे.