कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
schedule22 Oct 24 person by visibility 167 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूरच्या रस्त्यांवर दुचाकीस्वारांची धूम पाहायला मिळाली. 'गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड' या प्रसिद्ध कंपनीतर्फे 'चाय-पकोडा' बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. 'चाय-पकोडा' बाइक रॅलीचे हे दुसरे वर्ष आहे.
कोल्हापुरातील केएसबीपी उद्यानाजवळ बाइक रॅलीला सुरुवात झाली होती. २३ किलोमीटरपर्यंत हा मार्ग होता. सादळे माधळे येथील 'माउंटन व्यूव्ह रिसॉर्ट' येथे रॅलीची सांगता झाली. गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेडतर्फे बाइकस्वारांना सुरक्षित जॅकेट पुरविले गेले. रॅली व्यवस्थित पार पडल्यानंतर कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी विविध खेळांचे आयोजन केले गेले.
बाइक रॅली कार्यक्रमाबद्दल माहिती देताना 'गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी चावला म्हणाले , " दुचाकीस्वारांमधील धाडसी प्रवृत्ती, तसेच एकमेकांबद्दल बंधुता टिकून राहावी या हेतूखातर आम्ही रॅलीचे आयोजन करतो.”