+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 115 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘उद्यमनगरीचा अभ्यासू आणि उत्साही उद्योजक म्हणजे गजेंद्र उर्फ बाबाभाई वसा होतं. त्यांनी केवळ व्यवसायच केला नाही तर अनेक उद्योजक-व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम राहिले. नवं व्यावसायिकांचे स्वागत केले.’अशा भावना शोकसभेत उमटल्या.  
 उद्योजक  बाबाभाई ठाकरसी वसा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाटी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शोकसभा आयोजित केली होती. या सभेत भावना व्यक्त करताना  कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर म्हणाले, ‘ बाबाभाई वसा दानशूर व्यक्तीमत्व होते.त्यांनी केवळ बिझनेस केला नाही तर लोकसंग्रह वाढविला. प्रत्येक उद्योजकाचे  नेहमीच उत्साहाने स्वागत करायचे. एका उत्साही उद्योजकांस कोल्हापूरच्या उद्यमनगरीने गमावला.’स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, ‘बाबाभाईंनी उद्योग क्षेत्राची येथून सुरवात करून उद्योग क्षेत्राला झळाळी दिली. प्रेमळ, शांत सुस्वभावी, स्वच्छ व पारदर्शी व्यवहार म्हणजे बाबाभाई. उद्योग क्षेत्रात त्यांच्यामुळे खुप मोठा प्रभाव पडला.’ सचिन मेनन म्हणाले,  ‘बाबाभाई उत्साही मनाने सर्वांशी वागायचे, त्यांचे कोणाशीही मतभेद झाले नाही. त्यांचे निणर्य सर्वांनाच मान्य असायचे, त्यांच्या बाहेर आणि मनातही कधी रागाचा लवलेशही दिसला नाही.’ मोहन कुशिरे यांनी,  ‘ संघटनेत राहून आपली गुणवत्ता कशी असली पाहिजे यासंबंधीची शिकवण दिल्याचे सांगितले.
साजिद हुदली यांनी बाबाभाई उत्कृष्ट खेळाडू होते. अनेक समस्यावर चांगला मार्ग काढायचे चेहरा हसरा ठेवून म्हणायचे तुझा नशिबातील कोणीही काढून घेवू शकत नाही. आज या उद्यमनगरीने तुम्हाला जे शिकविले ते कोठेही मिळणार नाही, त्यांच्यामुळे आंम्हास अनेक संधी मिळाल्या.’याप्रसंगी संजय पेंडसे, प्रदीप कापडिया,  श्रीकांत दुुधाणे, नितीन वाडीकर,  एम. वाय. पाटील, कमलाकांत कुलकर्णी यांनीही त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.   
 याप्रसंगी  उद्योजक प्रसन्न तेरदाळकर,  हर्षद दलाल, जयदिप मांगारे, विश्वजित सावंत, हिंदूराव कामते, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव, श्रुीमती साधना वसा, मनिषा देसाई, तेजल मेहता, हार्दिका वसा, दिप वसा, देविका वसा, कुश वसा, रोहीत वसा, जयराज वसा, किरण वसा,गिरीष वसा, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे  उपस्थित होते.