भ्रष्टाचार करणार नाही, टक्केवारी खाणार नाही - आपच्या उमेदवारांचे शपथपत्र
schedule09 Jan 26 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " कोल्हापूर महानगरपालिकेत मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही आणि भ्रष्टाचार करणार नाही " अशा पद्धतीचे शपथपत्र आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी जाहीर केले. महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून 14 उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांनी शपथपत्र सादर करत वेगळेपण दाखविले. " माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही. मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही. जनसंपर्कसाठी माझा फोन 24 तास सुरू राहील. ज्या पक्षातून निवडून आलो तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही " असे शपथपत्र दिले आहे. आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव सदिप देसाई म्हणाले " महापालिका राजकारणातील चुकीच्या प्रवृत्तींना विरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिका म्हणजे भ्रष्टाचार आणि टक्केवारी असे समीकरण तयार झाले आहे. आम आदमी पक्ष स्वच्छ कारभार देण्यासाठी कटिबद्ध आहे. राजर्षी शाहू आघाडीला सोबत घेतल्याशिवाय महापालिकेत कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही, इतके आमचे संख्याबळ असेल." असे त्याने सांगितले. आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी शपथपत्राचे वाचन केले.